gold rates rise

एके काळी भारताला ‘सोने की चिडिया’ असे म्हणतले जात होते पण सध्याची परिस्थिती जरी आपण बघितली तरी भारत अजूनही ‘सोने की चिडिया’ आहेच कारण आपण जगातील दुसरा सर्वात मोठा सोने वापरणारा देश आहे.

भारतात सोन्याची खरेदी केवळ गुंतवणूक करण्यासाठी नाही तर विविध सणसमारंभासाठी देखील केली जाते. शिवाय, अलिकडच्या काळात लोक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत.



जागतिक world Gold Council नुसार, भारतीय घरांमध्ये असलेले सोने तब्बल 24000 ते 25000 टन आहे. भारतातील धार्मिक संस्थांमध्ये ठेवलेली सोने यात समाविष्ट केलेली नाही. world Gold Council अनुमान लावले आहे की, तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरामध्ये अमेरिकेच्या 22 अरब डॉलर रकमेचे सोने आहे आणि भारतातील सर्व मंदिरांमध्ये 4000 टन सोने आहे. भारताच्या केंद्रीय बँक आरबीआयने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 40.45 टन सोने खरेदी केले होते, आरबीआयच्या एकूण 653 टन सोने खरेदी केले आहे.



भारतातील सोन्याच्या किमतीचा इतिहास

सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा तपशील जाणून घेण्याआधी, भारतातील सोन्याच्या किमती विविध दशकांमध्ये पाहू या. किंमती कशा वाढल्या आहेत हे समजून घेण्यास हे आपल्याला मदत करेल.

वर्षसोन्याची सरासरी किंमत (प्रति 10 ग्रॅम)
1980रु. 1,800
19903,200 रु
20004,500 रु
2010रु. 18,500
201126,000 रु
201231,500 रु
2013२९,००० रु
2014रु 27,500
201526,000 रु
2016रु 28,500
2017२९,५०० रु
201831,000 रु
201935,000 रु
202049,500 रु
202152,000 रु
202248,500 रु
202364,500 रु

भारतात सोन्याचे भाव का वाढत आहेत?



आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील आर्थिक संकट. तिथे रोजगार निर्देशांक खूप खाली गेला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रालाही मंदीचा फटका बसला आहे. शेअर बाजारातही मंदी आहे. जगातील प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवते. मोठमोठे खाणमालक, मोठे उद्योगपती या संघटनेत आहेत. या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढत आहे.



दुसऱ्या बाजूला भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 83.40 रुपये आहे. भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचं हे देखील एक कारण आहे. जागतिक बाजारात सोन्याचे मूल्य अमेरिकन डॉलरमध्ये आहे. म्हणून, जेव्हा अमेरिकन डॉलर इतर चलनांच्या तुलनेत मजबूत होतो, तेव्हा सोन्याची किंमत डॉलरच्या दृष्टीने कमी होते. याउलट, जेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो तेव्हा सोन्याची किंमत वाढते. हा संबंध आहे कारण एक मजबूत डॉलर इतर चलन धारकांसाठी सोने अधिक महाग करतो, ज्यामुळे मागणी कमी होते आणि किमती कमी होतात तर कमकुवत डॉलर सोने तुलनेने स्वस्त बनवते आणि मागणी वाढवते, त्यामुळे किंमत वाढते.

आपण सोन्यात गुंतवणूक केली पाहीजे का?



लोक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत आहेत. सोने ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचं सिद्ध झालंय. लोक समजा आपल्याकडे पैसे असतील तेव्हा सोनं खरेदी करावं असं सहसा बोलतात. आता सोनं खरेदी करणं ही अल्पकालीन गुंतवणूक आहे. पण लग्नासारख्या मोठ्या समारंभासाठी सोनं नक्कीच खरेदी करता येईल.

भारतीय लोक सोन्यात मोठी गुंतवणूक करतात. पण हेच पैसे बँकेत भरल्यास, व्याजदर कमी असतो. अनेक लोक सोन्यात गुंतवणूक करतात कारण ती सुरक्षित गुंतवणूक आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढून भाववाढ झाली आहे. भारतासह इतर काही आशियातील देशांमध्ये सोन्याकडे मालमत्ता म्हणून पाहिलं जातं. परंतु इतर देशांमध्ये सोनं ही एक गुंतवणूक मानली जाते.

किंमत वाढतेय तर आपण सोनं विकावे कि नाही?



जेव्हा सोन्याची किंमत सतत वाढत असते तेव्हा बरेच लोक सोनं विकण्याचा विचार करतात. स्टॉक मार्केटच्या बाबतीत, जेव्हा किंमत वाढते तेव्हा आपण स्टॉक विकतो परंतु सोन्याबाबतचा विचार केला तर शक्यतो सोने विकू नये, कारण सोनं कायम तेजीत असणार आहे. गेल्या 20 वर्षांचा विचार करता सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत कारण सोन्याची मागणी वाढली आहे.

आर्थिक अडचण असल्यास सोने न विकत ते बँकेत ठेवून गोल्ड लोन करू शकता. अनेक राष्ट्रीय बँका कमी व्याजदरात सोन्यावरती कर्ज उपलब्ध करून देतात.

यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशी अनेकांची अपेक्षा होती. पण यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत सध्या निवडणुकीचा हंगाम सुरु झाला आहे, त्यामुळे राजकीय बदलही सोन्याच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे तसेच महागाई कायम राहिल्याने सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोन्याच्या किमती 2025 पर्यंत वाढतच राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.