ujjval-nikam

भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आपला जन्म हनुमान जयंतीला झाल्याचा उल्लेख करत त्यांनी आपल्यासमोर कुठलंही आव्हान नसल्याचं म्हटलं आहे.



उज्ज्वल निकम यांनी देशविरोधी कारवायांमधील अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी खटले लढले आहेत. त्याचा राजकीय फायदा होईल, असे भाजपला वाटत असल्यामुळे कदाचित त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात असल्याची चर्चा आहे.



वर्षा गायकवाड या यांच्या विरोधातील उमेदवार आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे.



१९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहता निकम यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.