Anant Gite Raigad Loksabha

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवसभरात त्यांच्याशिवाय अन्य तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केल आहेत. सोमवारी १५ एप्रिल रोजी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.



निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांचा अर्ज स्वीकारला. यावेळी आमदार भास्कर जाधव, शेकाप आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे प्रविण ठाकूर आणि अनिल तटकरे उपस्थित होते. अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. शेकाप भवन येथून एक पदयात्रा सुरु झाली.



छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर गीतेंसह अन्य मान्यवरांनी शवाजी महाराजांना अभिवादन केले. यानंतर अलिबागची ग्रामदेवता काळंबादेवीचे दर्शन घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासह फक्त पाचजण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.



अनंत गीते नावाचे आणखी दोन उमेदवार:
लोकसभा, विधानसभा निवडणूकीत प्रमुख पक्षाच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेली माणसं उभी करण्याची चाल यावेळीही विरोधकांनी खेळली आहे. शिवसेना नेते अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापुर्वी, अपक्ष अनंत पद्मा गिते आणि अनंत बाळोजी गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.