Shivsena Eknath Shinde

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे): गव्हाण जिल्हा परिषद मधील गव्हाण,न्हावा , वहाळ, तरघर, उलवे या ग्रामपंचायत मधील प्रकल्पग्रस्तांना सिडकोने दिलेल्या भूखंडावर बिल्डरांच्या ५०% सहभागातून आपली घरे विकसित केली आहेत. म्हणजे या शहराचे मालक येथील प्रकल्पग्रस्त आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे संघटनात्मक प्राबल्य प्रकल्पग्रस्तांचेच आहे. मात्र शिवसेना(शिंदे गट )याला अपवाद ठरली आहे.



शिवसेनेच्या जिल्हास्तरावर वरिष्ठांनी या शहराचा संघटनात्मक प्रमुख म्हणून एक वर्षापूर्वी इथे राहावयास आलेले श्री. वायंगणकर याला देऊन स्थानिक शिवसैनिकावर मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे येथील सर्वच पदाधिकारी व शिवसैनिक संतप्त झाले आहेत.



याबाबतीत सर्व स्तरावर येथील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी सातत्याने वरिष्ठ स्तरावर वरिष्ठांचे लक्ष वेधूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक व पदाधिकारी संतप्त आहेत.

जे वरिष्ठ स्तरावरील पदाधिकारी आहेत. ते स्वतःच्या गावात ही अजून पर्यंत शिवसेनेची शाखा काढू शकले नाहीत, या राज्याचे कर्तबगार धडाकेबाज मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेबांना चुकीची माहिती देऊन वरिष्ठांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप उलवेतील शिवसेना पदाधिकारी करत आहेत. याबाबतची वरिष्ठाने दखल घेतली पाहिजे असे येथील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना वाटते.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.