teachers day


भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

डॉ.राधाकृष्णन यांनी भारताच्या शिक्षणाला आकार देण्यात मोलाचा वाटा उचलला आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या योगदानामुळे अनेकांना शिक्षण उपलब्ध झाले आणि म्हणूनच ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो.



डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एक उत्तम शिक्षक होते ज्यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षे अध्यापनाच्या व्यवसायात वाहिले. ते विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांच्या योगदानासाठी आणि भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. म्हणूनच शिक्षकांविषयी विचार करणारे आहेत. एकदा त्यांचे विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना सांगितले की ते त्यांचा वाढदिवस साजरा करू इच्छितात. त्यावर त्यांनी सांगितले होते, ‘माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिवस म्हणून साजरा झाला तर मला अभिमान वाटेल.’ हा दिवस १९६२ सालापासून शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला.



जीवनात शिक्षकांचे महत्त्व:
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षणा देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.



कसा साजरा केला जातो हा दिन:
या दिवशी अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम जसे उत्सव, शिक्षकांप्रती आभार व्यक्त करणे किंवा आपले मनोगत व्यक्त करणे असे आयोजन केले जातात. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांचे सन्मान करतात. अनेक विद्यार्थी पुष्पगुच्छ, भेटवस्तू, ग्रीटिंग देऊन आभार प्रदर्शन करतात.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.