2 yrs old child murder mangaon


माणगांव तालुक्यात बोर्ले गावातील रुद्र अरुण यादव, वय २ वर्ष ३ महिने या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली होती, तसेच या घटनेचा माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता.



फिर्यादी सुनिल बारीकराव यादव यांच्या घरासमोरील अंगणातून आरोपी संतोष अशोक यादव, वय ३० वर्ष, रा. मु. पो. बोर्ले, ता. माणगांव याने त्यांच्या लाल काळ्या रंगाच्या होंडा शाईन गाडी क्र. एम. एच. ०६ बी एक्स ८८२४ वरून फेरफटका मारण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलगा कु. रुद्र अरुण यादव, वय २ वर्ष ३ महिने याला त्यांचा अज्ञातपणाचा फायदा घेऊन पालकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने पळवून नेले होते.



सदर आरोपी संतोष यादव याला शोधण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे, परंतु आरोपीला पकण्यापूर्वीच दोन वर्षाच्या छोट्या रुद्रची या नराधमाने रोहा तालुक्यातील (चणेरा) गावच्या हद्दीत हत्या केली असून सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.



हा प्रकार कौटुंबिक वादातून झालेला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस करत आहेत.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.