malvika-gaekwad


हल्लीच मुळशी पॅटर्न चित्रपटाने मराठी चित्रपटश्रुष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले. प्रेक्षकांनी तर सिनेमाला प्रचंड डोक्यावर घेतले. हा चित्रपट इतका यशस्वी झाला कि खुद्द सलमान खानने त्याचा हिंदीत ‘अंतिम’ नावाचा चित्रपट रिमेक केला.



मुळशी पॅटर्नमध्ये एका चहावालीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या कामाची चांगलीच चर्चा झाली होती, तिचे नाव मालविका गायकवाड. अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना, तिने उत्तम प्रकारे आपले पात्र रेखाटले.



मालविकाने चहावालीची भूमिका देखील अगदी सहजपणे रेखाटली. त्यामुळे सगळीकडूनच तिचे खास कौतुक करण्यात आले होते. सिनेमामध्ये अभिनय करण्यापूर्वी मालविका गायकवाड एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये जॉब करत होती. मालविका एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला आयटी कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.गडगंज पगाराच्या नोकरीसाठी मालविका सुरुवातीच्या काळात अगदी उत्साहित होती.



एका जिममध्ये वर्कआऊट करताना, कोणीतरी मालविकाला थेट सिनेमात काम करणार का असा प्रश्न विचारला. त्यावेळी तिने हसत, कदाचित हा मस्करी करत आहे असा विचार करत हो म्हणलं. मात्र, त्यानंतर लगेच काहीच दिवसात तिची आणि प्रवीण तरडेंची भेट झाली आणि मुळशी पॅटर्नमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. मुळशी पॅटर्न सिनेमातून तिने मराठी चित्तरपटसृष्टीमधे पदार्पण केले. त्यामुळे तिचे विशेष कौतुक देखील करण्यात आले. त्यानंतर मात्र, मालविकाने चित्रपटात फारसा रस दाखवला नाही. कारण सुरुवातीपासून तिला शेतीविषयक क्षेत्र जास्त आकर्षित करत होते.

शेतीमध्ये मालविकाला खूप रस होता. त्यामुळे आपण कमावलेल्या पैशांमधून तिने शिरुर येथे दीड एकर शेती विकत घेतली. त्यामध्ये तिने सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. तिच्या कुटुंबीयांनी आणि काही मित्र परिवारने तिला शेती करते म्हणून वेड्यात देखील काढले. मात्र मालविकाने या सर्व गोष्टींचा विचार केलाच नाही. हळहळू तिचा बिझनेस वाढू लागला. विशाल चौधरी आणि जयवंत पाटील या खास मित्रांसोबत एकत्र येऊन ती दुग्ध व्यवसायात देखील उतरली. ‘द ऑरगॅनिक कंपनी’ नावाने तिने सुरु केलेल्या कंपनीचा फायदा थेट शेतकऱ्यांना देखील झाला.

नुकतेच ते सोनी टीव्हीवरील शार्क टॅंक शो मध्ये येऊन आपल्या उद्योगाबद्दल माहिती दिली. ‘हंपी A२’ नावाची कंपनी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, कोकोनट ऑइल यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीची उलाढाल कोटींच्या घरात आहे. १८-२० कोटींच्या या कंपनीचे नेट प्रॉफिट तब्ब्ल ४ कोटी रुपये आहे. एक यशस्वी आयटी इंजिनियर, अभिनेत्री आणि उद्योजिका म्हणून मालविकाला आता ओळखले जात आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.