ekveera kala sanstha program


उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे)- एकविरा कला संस्था (पनवेल रायगड) या संस्थेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी नेहमी सातत्याने केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी नेहमी आंदोलन उपोषणामध्ये एकविरा कला संस्था सहभागी झाली आहे.



लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व दि बा पाटील यांच्या विचारांची संस्कृती जपण्यासाठी एकविरा कला संस्था (पनवेल रायगड) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवार दि.7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9:30 वाजता आगरी समाज मंगल कार्यालय, गणेश मंदिर शेजारी, कामोठे गाव, नवी मुंबई येथे ‘दिबा साहेबांना सांस्कृतिक आदरांजली’ या नावाने अभंग स्पर्धा, पखवाज वादन स्पर्धा, तबला वादन स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.



सादरीकरण कालावधी 1 ते 5 मिनिटाचा असून वय वर्षे 10 ते 18 व 18 ते खुलागट असे स्पर्धेचे गट आहेत. शिवाय विविध मान्यवरांचा दिबांचा योध्दा म्हणून विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मराठी इंडियन आयडल विजेता सागर म्हात्रे याचा विशेष नागरी सत्कार होणार आहे.



तरी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अविनाश पाटील 9930010422, मिलिंद कडू – 8080934938 यांच्याशी संपर्क साधावे.असे आवाहन एकविरा कला संस्था ( पनवेल रायगड) चे संस्थापक तथा अध्यक्ष तेजस पाटील यांनी केले आहे


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.