Skip to content
माझे मनोरथ पूर्ण करि देवा।
केशवा न माधवा नारायणा।। धृ ।।
नाही नाही मज आणिक सोयरा।
न करि अव्हेरा पांडुरंगा।। 1 ।।
अनाथांचा नाथ होसी तू दयाळा।
किती वेळोवेळां प्रार्थू आता।। 2 ।।
नामा म्हणे जीव होतो कासावीस।
केली तुझी आस आता तारी।। 3 ।।
अभंग चाल ऐका:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste