You are currently viewing नाम गातो तुझे रे गिरिधारी (Naam gaato tujhe re Giridhari)

नाम गातो तुझे रे गिरिधारी (Naam gaato tujhe re Giridhari)

  • Post author:
  • Post category:Abhang

हाती घेऊन आलो एक तारी…(२)
नाम गातो तुझे रे गिरिधारी…(३)….||धृ.||

पतीत पावन अनाथांच्या नाथा…(२)
चरणावरी रे तुझ्या ठेविला माथा….(२)
आळवितो मी तुजला आता…(२)
तुजला आता…
देई दर्शन श्याम मुरारी…(२)
नाम गातो तुझे रे गिरीधारी… ||१||

नाम तुझे ते घेता तरला…(२)
वाल्या कोळी वाल्मिक झाला…(२)
भक्तजणांचा उद्धार केला…(२)
उद्धार केला…
नेई तारून आलो दरबारी…(२)
नाम गातो तुझे रे गिरिधारी….||२||

महिमा तुझा तो अपरंपार…(२)
वसविले तू पंढरपूर…(२)
चोख्यासाठीच झाला महार…(२)
झाला महार….
तिन्ही लोकात आहे तुझी वारी…(२)
नाम गातो तुझे रे गिरिधारी…||३||


अभंग चाल ऐका: