॥ धन्य अंजनीचा सुत ॥ (Dhanya Anjnicha Sut)

  • Post author:
  • Post category:Abhang

धन्य अंजनीचा सुत
नाव त्याचे हनुमंत ॥ धृ ॥

ज्याने सीता शोध केली
रामे सीता भेटविली ॥ १ ॥

द्रोणागिरी तो आणिता
लक्ष्मण वाचविला ॥ २ ॥

तैसा मारुती उपकारी
तुका लोळे चरणावरी ॥ ३ ॥


अभंग चाल ऐका: