Skip to content
का रे देवा उशीर लाविला ।
तुझ्यासाठी जीव वेडा झाला ॥ ध्रु ॥
तुझ्यासाठी देवा सोडिले घरदार ।
सोडिले घरदार,
मोडीला संसार ॥१॥
तुझ्यासाठी देवा होईन भिकारी ।
होईन भिकारी
करीन तुझी वारी ॥२॥
तुझ्यासाठी देवा राहीन उपाशी ।
राहील मी उपाशी
करीन एकादशी ॥ ३ ॥
जनी म्हणे देवा होईन तुझी दासी ।
होईल तुझी दासी
येईन चरणापाशी ॥ ४ ॥
अभंग चाल ऐका:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste