Skip to content
तुकोबाची कान्ता सांगे लोकापासी ।
वेडा माझा जातो पंढरीसी ।।
फुटकाच विणा त्याला दोन तारा ।
घाली येरझरा पंढरीसी ।।
माझे आईबापे बरे नाही केले ।
पदरी भिकार्याच्या बांधीयले ।।
माझ्या चोघी बहीनी सुखाने नादंती ।
माझी कर्म रेखा ऐसी कैसी ।।
तुका म्हणे कान्ते ऐसे न बोलावे ।
शरण रिघावे विठोबासी ।।
error: Content is protected !! Unable to Copy or Paste