You are currently viewing गवळण- या कृष्णानं राधेचा फोडीला माठ (Ya Krushna ne Radhecha Fodila Maath)

गवळण- या कृष्णानं राधेचा फोडीला माठ (Ya Krushna ne Radhecha Fodila Maath)

  • Post author:
  • Post category:Gavlani

कृष्णानं राधेचा फोडीला माठ
या पेंद्यान कान्हाला दीलिया साथ
या कृष्णानं राधेचा फोडीला माठ ||

कृष्णानं राधेचा फोडीला माठ
या पेंद्यान कान्हाला दीलिया साथ
या कृष्णानं राधेचा फोडीला माठ ||

दह्या दुधाचा आमुचा धंदा
दही दूध चोरून खातो मुकुंदा
या कान्हाने अडविली आमची वाट ||१||

रोज रोज चाळे करून थकला
दही दूध अंगावर घेऊन माकला
या राधेने कृष्णांचा धरिला हाथ ॥२॥

एका जनार्दनी गवळण राधा
मुरली मनोहर नंदाचा कंदा
या गोकुळचा कृष्ण मुरारी नाथ ||३||


गवळणीची चाल: