राधे तुझ्या कानात
झुंबर वाऱ्याने हलतंय गं
झुंबर वाऱ्याने हलतंय गं
कान्हा गोड गोड बोलतंय गं !!धृ!!
घागर घेऊनी मथुरेशी जाता
आड रस्त्यामधी कान्हा उभा होता….
राधे तुझ्या कानात !!1!!
दहिदुध घेऊनी मथुरेशी जाता
आड रस्त्यामधी कान्हा उभा होता….
राधे तुझ्या कानात !!2!!
एका जनार्दनी गौळण राधा
नको लागू कान्हाच्या नादा….
राधे तुझ्या कानात !!3!!