गवळ्या घरची भोळी राधा
कान्हा ला भुळवते
डोळा मारुनी तोंड मुरडते
कान्हा ला भुळवते राधा कान्हा ला भुळवते !! धृ!!
दोईवर बाई दुधाचे माट
विकायला घाई करते बाजारी
गवळ्या घरची भोळी राधा कान्हा ला भुळवते !!१!!
दोईवर बाई धयाचे माट
द्यायला नाही म्हणते कान्हाला
गवळ्या घरची भोळी राधा काम्हा ला भुळवते !!२!!
एका जनार्दनी गवळण राधा
कान्हाला भुलवते ही राधा हरीचे गुण गाते
गवळ्या घरची भोळी राधा कान्हा ला भुळवते !!३!!