You are currently viewing अगं राधे तू हळुहळु चाल ना (Ag Radhe tu Halu Halu chaal na)

अगं राधे तू हळुहळु चाल ना (Ag Radhe tu Halu Halu chaal na)

  • Post author:
  • Post category:Gavlani

अगं राधे तू हळुहळु चाल ना
त्या मथुरेच्या बाजारी भेट ना ।।

तुझ्या केसात हाय गजरा,
तू करू नको लय नखरा ।।

तिथे भेटेल यशोधेचा हरी
करील तुझ्याशी गं कुरघोडी ।।

तुझ्या नाकात हाय नथनी,
न तुझी तो करल गं खोडी ।।

हा नंदाचा खट्याळ कान्हा,
करतो गोकुळात धिंगाणा ।।

तुझी ओढील गं वेणी,
त्या भरल्या गं बाजारी ।।

तुझी रंगाने भिजवेल साडी,
राधे करू नको मस्करी ।।

तनुजा गाते गवळणीला,
ऐक तू माझं जरा ।।



English Lyrics: