You are currently viewing अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना (Are Krushna Are Kanha)

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना (Are Krushna Are Kanha)

  • Post author:
  • Post category:Gavlani

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ||

देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी

सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दीवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी म्हणे हरी हा भक्तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना


गवळण चाल ऐका: