You are currently viewing गवळण- खोड्या नको करू माझे बाबा हो (Khodya Nako Karu Majhe Baba Ho)

गवळण- खोड्या नको करू माझे बाबा हो (Khodya Nako Karu Majhe Baba Ho)

  • Post author:
  • Post category:Gavlani

खोड्या नको करू माझे बाबा होsss….(3)….||धृ.||

हाती घेवोनिया काठी, शिकविते जगजेठी…..(2)
यमुनेची माती खासी का का का
यमुनेची माती खासी का का का बाबा…
खोड्या नको करू माझे बाबा होsss….(3)….||1||

यशोदेने धरीला करी, बैसविला मांडीवरी…..(2)
मुख पसरूनी करीतो आ आ आ
मुख पसरूनी करीतो आ आ आ बाबा…
खोड्या नको करू माझे बाबा होsss….(3)….||2||

विष्णूदास नामा म्हणे, मरोनिया जन्मा येणे…..(2)
कृष्ण सनातनी पाहू या या या
कृष्ण सनातनी पाहू या या या बाबा….
खोड्या नको करू माझे बाबा होsss….(3)….||3||


गवळण चाल ऐका: