javahar navoday vidyapeeth

माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वर्ष 2021-22 इयत्ता सहावी व नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 15 डिसेंबर २०२० आहे.

इयत्ता सहावीसाठी पाचवीत शिकत असणारे आणि 1 मे 2008 ते 30 एप्रिल 2012 (दोन्ही दिवस धरुन) यादरम्यान जन्मतारीख असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत. अर्ज केल्यावरती आपणांस केंद्राची माहिती कळेल. परीक्षा 10 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ठरलेल्या केंद्रावर होईल.


नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी इयत्ता आठवीत शिकत असलेले आणि 1 मे 2005 ते 30 एप्रिल 2009 (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान जन्मतारीख असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. परीक्षा 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे होईल.


खालील लिंकवरती जाऊन आपण अर्ज भरू शकता.
https://navodaya.gov.in/nvs/en/Home1/
https://www.nvsadmissionclassnine.in/nvs/homepage

इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी अधिक माहितीसाठी नवोदय स्टाफ संतोष चिंचकर (मो.9881351601), राकेश कुमार मीणा (मो.9146156642), लक्ष्मण तिगोटे (मो.9421169088), कैलास वाघ (मो.9527256185) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी प्राध्यापक प्राचार्य एस.व्ही. बोभाटे यांनी केले आहे.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.