new sansad bhavan bhumipujan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती पसरमाध्यमांना दिली.

कसे असणार नवे संसद भवन:


नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे ८८८ जागा उपलब्ध असतील तर राज्यसभा सदस्यांसाठी ३२६ पेक्षा अधिक जागा उपलब्ध असणार आहेत. म्हणजेच नव्या संसद भवनात एकूण १,२२४ सदस्य एकाचवेळी बसू शकतील. साधारण पुढील दोन वर्षांत ७५ व्या स्वातंत्र्यदिनी आपण या नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु करणार आहोत अशी माहिती ओम बिर्ला यांनी दिली.

किती खर्च येणार:


नव्या संसदेची इमारत ही आत्मनिर्भर भारताचं मंदिर असेल. यामध्ये भारतातील विविधतेचं दर्शन घडेल. जुन्या संसद भवनाच्या इमारतीच्या तुलनेत नवी इमारत १७,००० स्केअर फूट मोठी असेल. एकूण ६४,५०० स्केअर मीटर जागेत ही वास्तू उभारली जाणार आहे.

यासाठी तब्बल ९७१ कोटी रुपये खर्च येणार असून ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’ कंपनीकडे या इमारतीच्या उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे तर एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने या इमारतीचे डिझाईन बनवले आहे.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.