shrivardhan electricity issue

श्रीवर्धन तालुक्यातील पाभरे ते सकलप दरम्यान 22 केव्ही भूमीगत वाहिनी कार्यान्वित करणे तसेच श्रीवर्धन ते जांभूळ यादरम्यान 22 केव्ही उच्चदाब वाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत श्रीवर्धन उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत होणार आहे. तशी माहिती श्रीवर्धन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैजन यांनी केले आहे.




आज (८ डिसेंबर) सकाळी १०.०० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत श्रीवर्धन तालुक्याअंर्तगत श्रीवर्धन शहर, मेटकरणी, आराठी, खेर्डी, चिखलप, हुनवेली, वाळवटी, आरावी, शेखाडी, गोठण, भरडोली, मेघरे, मामवली, बापवली, कासारकोंड, पुनीर, भोस्ते, वडघर, पांगळेली, जांभूळ, गाणी, जसवली, रानवली, गालसुरे, निगडी, कोलमांडला, सायगाव, काळींजे, कुरुवडे, मारळ, हरेश्वर, भेंडेखोल, बागमांडला व इतर आजूबाजूची छोटी गावे यांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे.
 
याची सर्व वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैजन यांनी केले आहे. तसेच कामाच्या गरजेनुसार वरील वेळेत बदल होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.