varun on raj thakre family

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला त्यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे हे उपस्थित आहेतच, मात्र अमित यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सूनबाई मिताली ठाकरेही यासुद्धा हजर राहिल्या. युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी ठाकरे कुटुंबाच्या हजेरीवरुन निशाणा साधला.



अमित आणि मिताली हे दाम्पत्यही मनसेच्या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख शहराध्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.



महापालिका निवडणुकांसाठी मनसेकडून विशेष समिती तयार करण्यात येणार आहे. या समितीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करुन, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. सर्व महापालिका स्तरावर ही एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल.



error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.