ravi mundhe

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, माजी पालकमंत्री मा.आमदार श्री. रविंद्र चव्हाण तथा विधापरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री. प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना दक्षिण रायगड माजी जिल्हा प्रमुख मा.श्री.रविभाऊ मुंडे यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला.



त्यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. महेश मोहिते, माणगाव तालुका अध्यक्ष श्री संजय (आप्पा) ढवळे, कैलास पायागूडे तसेच कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

नागराध्यक्षांसहित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश:



तळा नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. रेश्मा मुंढे यांच्यासह ज्ञानेश्वर घरटकर, विशाल मुंढे, रवींद्र शिगवण, चेतन चोरगे, रितेश मुंढे, सागर मुंढे यांनी देखील भाजप नेतृत्वावरती विश्वास दाखवत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.



रायगड जिल्ह्यात रवी मुंढे यांना ताकद देण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिले असल्यामुळे रायगड जिल्ह्यात परिवर्तनाची लाट पाहायला मिळेल असा विश्वास रवी मुंढे यांनी व्यक्त केला.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.