5 days ago Buziness Bytes Old notes of 100, 10 and five rupees will be discontinue!

मार्च महिन्यानंतर शंभर, दहा व पाचच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाने दिली होती. यासंबंधी माध्यमांवर बातम्या झळकल्यानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ सुरू झाला आहे.



या गोंधळामुळे नागरिक आपल्याजवळील जुन्या शंभर, दहा व पाचच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने यासंबंधी अद्यापही कोणती स्पष्ट सूचना जारी केली नसली तरीही सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.



प्रसार माध्यमांवर बातम्या झळकल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा नोटबंदीचे दिवस आठवल्याने बरेच जण जुन्या शंभर, दहा व पाचच्या नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये येऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याच व्यापाऱ्यांनीदेखील खबरदारी म्हणून या नोटा स्वीकारणे बंद केले आहे.



रिझर्व बँक ऑफ इंडियाने जुन्या नोटा बंद होण्यासंबंधी अद्याप कोणतेही अधिकृत परिपत्रक जारी केलेले नाही. जुन्या नोटा बंद होणार असल्याच्या बातम्या तसेच व्हॉट्सॲप फॉरवर्डद्वारे बँक कर्मचाऱ्यांना माहिती मिळालेली आहे.



अनेक व्यापारी जुन्या नोटा घेत असून आरबीआयने यासंबंधी अधिकृत परिपत्रक जारी केले तर ग्राहक आणि व्यापारी यांच्या मनातील गोंधळ दूर होईल आणि बँकेतही गर्दी होणार नाही, असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.