mnc heritage mumbai

आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत आता सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत सर्वसामान्यांसाठी हेरिटेज वॉकची सुविधा सुरु केली आहे.



मुख्यमंत्री उद्ध्व बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉकचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कामांचं कौतुक केलं.

मुंबई महापालिकेत याआधी येण्याची संधी मिळाली नव्हती. ही संधी आज आदित्य ठाकरेंमुळे मिळाली आणि इथे येता आलं. कधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना वाटलं नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना ही इमारत दाखवावी. मी हे लक्षात ठेवेन. शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं”, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.



मुंबई महापालिकेची टोलेजंग आणि ऐतिहासिक इमारत बघणं आणि सव्वाशे वर्षांपूर्वीच्या वास्तुकलेचा अनुभव सर्वसामान्यांना घेता येणार आहे. मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणबाबत ज्या वास्तूत निर्णय घेण्यात आले त्या वास्तूच्या इतिहासाशी समरस होण्याची संधी या निमित्ताने सर्वसामान्यांना मिळणार आहे.



मी आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी खरंच एक चांगला विचार केला”, असं अजित पवार म्हणाले.

नुकतंच पुण्यात आपण जेल टूरिझमसुद्धा सुरू केलं आहे. पुण्याच्या जेलला एक इतिहास आहे. ही सुरुवात आहे”, अशा शब्दात अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.



error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.