raksha khadse

भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रावेर मतदारसंघातील भाजपा खासदार व एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणाची दखल घेतली असून, अशा प्रकारे महिलांचे अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही असे देशमुख म्हणाले.



गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगितले की, ‘भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने संबंधित दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल.’ असे ट्विट अनिल देशमुखांनी केले आहे.



त्यानंतर ही चुक लक्षात आल्यावर हा चुकीचा उल्लेख काढून टाकण्यात आला, ती चुक सुधारण्यात आली. प्रत्यक्षात हा गुगलच्या भाषांतराचा गोंधळ असल्याचे सांगण्यात आले आहे.



error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.