adani group investment in raigad

अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथे प्रस्तावित सिमेंट कारखान्यासाठी स्वतंत्र जेट्टी बांधण्याकरीता अदानी उद्याेग समूह यासाठी सुमारे १७१ काेटी रुपये खर्च करणार आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी (एम.सी.झेड.एम.ए) कडून स्वतंत्र जेट्टी बांधण्याची परवानगी मिळाली आहे.



मात्र शहाबाज संघर्ष समितीने जेटीसह सिमेंट कारखान्याला विराेध केला आहे. ४ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अदानी समूहाचा अलिबाग तालुक्यात शहाबाज येथे सिमेंटचा कारखाना प्रस्तावित आहे. या कारखान्यासाठी अदानी समूहाकडून कॅप्टिव्ह जेट्टी, कन्वेयर कॉरिडॉर आणि रस्ता बांधकाम करण्याची परवानगी मागण्यात आली होती. हा रस्ता अंबा नदीवरून अदानीच्या जेट्टीकडे येणार आहे.


धरमतर खाडी किनाऱ्यावरील दोन हेक्टर जागा या जेट्टीच्या बांधकामासाठी निवडण्यात आली आहे, तर कन्वेयर कॉरिडॉर आणि रस्त्यासाठी खाडी काठावरील दिड हेक्टर जागेचा विचार करण्यात आला आहे. नव्या जेट्टीवर कोरडा माल उतरवला जाणार आहे. हा माल गुजरातवरून छोट्या पुरवठादार नौकांमार्फत शहाबाज येथे आणला जाईल. या बांधकामासाठी सुमारे १५० खारफुटीची झाडे तोडली जातील परंतु तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक एका झाडाच्या बदल्यात दहा खारफुटीची नवीन झाडे लावली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.



प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही ‘जैसे थे’याआधीही विविध प्रकल्पांनी स्थानिकांना नोकरीत सामावून घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही ‘जैसे थे’ असल्याने स्थानिकांकडून सातत्याने प्रकल्पांना विरोध होत असल्याचे दिसून येते.



यापूर्वीही याच परिसरातून महामुंबई एससीझेड, रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवरसह अन्य कंपन्यांना हद्दपार केल्याचा इतिहास आहे. खरेदी केली १३० एकर जमीनअदानी उद्याेग समूहाच्या प्रस्तावित जेटी आणि सिमेंट कारखान्याला आमचा विराेध आहे. त्यांनी खासगी वाटाघाटीने सुमारे १३० एकर जमीन खरेदी केली आहे, तर अन्य एका सरकारी जमिनीवर त्यांचा डाेळा आहे. सदरची सुमारे १५० एकर जमीन शहाबाज ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे, असा दावा शहाबाज संर्घष समितीचे अध्यक्ष श्री. द्वारकानाथ पाटील यांनी केला आहे.


जाहिरातींसाठी संपर्क: 8767375013


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.