fastag in India

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी १५ फेब्रुवारी २०२१ मध्यरात्रीपासून देशातील सर्व टोलनाक्यांवर टोल पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला असून आता सर्व टोल प्लाझावर FASTag च्या माध्यमातून टोलची रक्कम घेतली जाईल. ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल त्या वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट रक्कम भरावी लागेल.



सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या वाशी टोल नाकामधून हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे वाशी टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. मात्र, आता फास्टॅगमुळे वाहनांना टोलनाक्यावर ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.



वाहनांवर फास्टॅग नसूनही फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2021 पासून सर्व चार चाकींसह अन्य वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे.

FASTag कुठे खरेदी करावा लागेल:




फास्टॅगने देशभरात 40,000 हून अधिक केंद्रे स्थापन केली आहेत, जिथून आपण फास्टॅग खरेदी करू शकता. याशिवाय फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम आणि अन्य डिजिटल वॉलेट कंपन्याही या विकत आहेत, म्हणून तुम्ही घरी बसून तुमच्या कारच्या पुढच्या विंडस्क्रीनवरही स्थापित करू शकता. आपण यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसह रिचार्ज देखील करू शकता. जर फास्टॅगचा बँक खात्याशी संबंध असेल तर खात्यातून आपोआप पैसे वजा केले जातील..

फास्टॅगची किंमत:
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने फास्टॅगची किंमत 100 रुपये निश्चित केली आहे. याशिवाय २००-३०० रुपये सुरक्षा ठेव द्यावी लागेल. ड्रायव्हिंग लायसन्स व वाहन नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सबमिट करुन आपण फास्टॅग खरेदी करू शकता. बँका केवायसीसाठी पॅनकार्ड व वापरकर्त्यांची आधार कार्डची प्रतही विचारतात.



फास्टॅग कसे कार्य करते:
फास्टॅग हे वाहनांच्या विंडस्क्रीनवर बसविलेले एक स्टिकर आहे. टोल क्रॉसिंग दरम्यान, डिव्हाइस टोल प्लाझावरील स्कॅनरला रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने कनेक्ट केले जाते आणि त्यानंतर फास्टॅगशी जोडलेल्या खात्यातून पैसे वजा केले जातात. ज्यामुुळे टोल प्लाझावर थांबायची गरज नाही.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.