unseasonable rain

आता पुन्हा राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.



हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत ही परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच कोकणातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.



मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर जळगाव जिल्ह्यातही गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.