ipl auction 2021

आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील ख्रिस मॉरिस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मॉरिसने मोडीत काढला आहे. दिल्लीने १६ कोटी रुपयांत युवराजला खरेदी केले होते. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने २०२१ च्या आयपीएल लिलावात १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे. संघमालकांमध्ये ७५ लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी रस्सीखेच झाली



ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघाने रस दाखवला. पण, १६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत राजस्थानने आपल्या संघात त्याला घेतले आहे. गतवर्षीच्या आयपीएलमध्ये ख्रिस मॉरिसने आरसीबीकडून खेळताना ९ सामन्यात ११ बळी घेतले होते.



या लिलवामध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक ३५ खेळाडूंचा समावेश आहे. त्यानंतर न्यूझीलंड (२०), वेस्ट इंडिज (१९), इंग्लंड (१७), दक्षिण आफ्रिका (१४) आणि श्रीलंका (९) यांचा समावेश असून अफगाणिस्तान (७), बांगलादेश (४) आणि अमेरिका, यूएई व नेपाळ येथील प्रत्येकी एका खेळाडूचाही समावेश आहे.



ख्रिस मॉरिस ( Chris Morris), ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) यांच्यानंतर गोलंदाज झाय रिचर्डसन ( Jhye Richardson) याला ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजली. १.५ कोटी बेस प्राईज असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासाठी किंग्स पंजाबनं ( Kings Punjab) १४ कोटी मोजले.



आयपीएल इतिहासात प्रथमच तीन खेळाडूंवर १४ किंवा त्याहून अधिक कोटींची बोली लागली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल तब्बल १४.२५ कोटींच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात दाखल झाला आहे.

हरभजन सिंगसाठी कुणीच इच्छुक नाही, ठरला अनसोल्ड.



error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.