divorce celebration pune

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरटेलिग्राम चॅनेल शेअरचाट

सध्या आपण सोशल मिडियावर सर्वत्र घटस्फोट सोहळ्याची चर्चा पाहतच आहोत. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या फोटोने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडलं आहे. घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्की हा प्रकार काय आहे या विचाराने सारेच चिंतेत पडले.

नेटकऱ्यांच्या असंख्य संमिश्र प्रतिक्रिया याबाबतीत पाहायला मिळाल्या. एवढंच बाकी राहील होतं.. आता काय काय बघायला भेटेल… पुणे तिथे काय उणे… नादच खुळा… लोक कशा-कशाचे सोहळे करतील काय सांगता येत नाही अशा एक ना अनेक प्रतिक्रिया या फोटोवर येत आहेत.



सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून ‘मंगलाष्टक रिटर्न’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या नवीन मराठी चित्रपटाअंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा हा एक भाग आहे. नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे, हा आगळावेगळा सोहळा कशाचे भाकीत उलगडणार आहे याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.



‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.