MSEB

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करण्यात यावे, यासाठी कोल्हापूरसह अन्य जिह्यांतील जनआंदोलने, तसेच वीज तोडल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, गेल्या आठ-दहा महिन्यांपासून थकबाकी असलेल्या वीज बिलवसुलीस महावितरणने सुरुवात केली आहे.



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ-दहा महिन्यांपासून थकबाकी असलेल्या वीज बिलवसुलीसाठी सध्या महावितरणकडून धडाका सुरू आहे. मात्र, याला ठिकठिकाणी विरोध व हल्ले होत आहेत. त्यानुसार आता महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱयांना शिवीगाळ, मारहाण, तसेच कार्यालयांची तोडफोड केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. यातील दोषींना दोन ते दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.



वीजबिल थकबाकी भरण्यासाठी चालू तसेच कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच वीज बिलांबाबत तक्रार निवारणासाठी सर्व कार्यालयांत हि सेवा उपलब्ध आहे.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.