shrimant dagadusheth halwai ganpati

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

पुणे शहरातील ऍक्‍टिव्ह करोना बाधितांची संख्या 4 हजार पेक्षा जास्त झाली आहे. जवळपास 449 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत, यापैकी 245 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहरात 11 लाख 28 हजार 332 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असून, त्यात 2 लाख 1 हजार 189 जणांना करोनाची बाधा झाली आहे.



खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला (मंगळवार, दि.२ मार्च 2021) मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या व पुजारांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील.



अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.

ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. www.dagdushethganpati.com


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.