krida sankul mangaon raigad

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

मौजे नाणोरे, माणगांव, जिल्हा रायगड येथे कोकण विभागाचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्याकरीता स.न. 130/0 मधील 10.00 हे. ( 24 एकर ) येथील शासकीय जागा उपलब्ध झाली असून, सदर जागा विभागीय क्रीडा संकुल, कार्यकारी समिती, मुंबई विभागाच्या नावावर करण्यात आलेली आहे.



प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुल, कोकण विभाग हे नवी मुंबई ऐवजी मौजे नाणोरे, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथे उभारण्यास शासन मान्यता
मिळाली आहे.



विभागीय क्रीडा संकुल, कोकण विभाग, माणगांव, जिल्हा रायगड यासाठी रू.8344.16 लक्ष (रुपये त्रयांऐशी कोटी चाळीस लाख सोळा हजार फक्त) इतक्या रकमेचे अंदाजपत्रक आराखडे सादर करण्यात आले असून, राज्य क्रीडा समितीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे.



सदर अंदाजपत्रकानुसार विभागीय क्रीडा संकुलामध्ये 400 मी. सिंथेटिक धावनपथ, फ़ुटबाँल मैदान, अथेलेटिक्स पॅव्हेलियन बिल्डिंग, हॉकी मैदान, चेंजिंग रूमसह, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी मैदाने, टेनिस कोर्ट, चेंजिंग रूम, आऊटडोअर गेम, अंतर्गत रस्ते, इनडोअर हॉल, जलतरण तलाव, डायव्हींग तलाव, संरक्षण भिंत, मुले-मुली वसतिगृह , रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोअरवेल इतर बाबी/ सुविधांचा समावेश आहे.



सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतिक क्र. 202103261313580521 असा आहे.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.