lockdown in maharashtra

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असून रोखण्यासाठी अखेर सर्वांची मते जाणून घेऊन राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात शुक्रवार ते रविवार पूर्ण लॉकडाऊन आणि सोमवार ते शुक्रवार अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या काळात गर्दीची ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात येत असून शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहतील, खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे, तर हॉटेल्स, नाट्यगृह, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील.



राज्यात काय सुरु राहणार:

  • किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार.
  • शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहतील.
  • सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू राहील.
  • रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
  • सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.
  • आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी व मास्क बंधनकारक.
  • बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे.
  • ई-कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील.
  • वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येतील.

लॉकडाऊन काळात काय बंद राहणार:

  • चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
  • सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील.
  • शाळा-महाविद्यालये बंद राहतील. फक्त 10 वी आणि 12 वी परीक्षा नियोजित वेळेनुसार सुरु राहणार.
  • सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.
  • उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील.
  • हॉटेल पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.
  • सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स बंद राहतील.

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.