mangaon covid fine

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


माणगाव तालुक्यात कोविड विषाणूचे रुग्ण सातत्याने दररोज वाढत आहेत. याकडे लक्ष केंद्रित करून माणगाव नगरपंचायत व पोलीस ठाणे कोविड संकटातील नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहन नागरिकांना, दुकानदारांना वेळोवेळी करीत आहेत.


या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या म्हणजेच विनामास्क बाजारपेठेत फिरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंग (सुरक्षित अंतर) न ठेवणाऱ्या नागरिकांकडून तसेच दुकानदारांकडून माणगाव नगरपंचायत व पोलीस प्रशासान यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे व उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे कारवाई करीत त्यांच्याकडून १६,५०० रुपयांची दंड वसुली करून दंडात्मक कारवाई केली आहे.



माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी विविध कामधंद्यानिमित्त लोक येत असतात. त्यामुळे माणगाव नगरीत दररोज लोकांची वर्दळ असते. कोविड विषाणूचा फैलाव खास करून गर्दीतून होताना पुढे आले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत येताना मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर सुरक्षित अंतरावर दोरी बांधून स्वतः मास्कचा वापर करा, हाताला सॅनिटायझर लावा, आपले हात साबण व पाण्याने वेळोवेळी स्वच्छ धुवा, कुणाच्या हातात हात शक्यतो देवू नका, कार्यक्रम, समारंभ स्पर्धांचे आयोजन करू नका असे निर्बंध तसेच नियम , अटी व शर्ती शासनाने घालून दिलेल्या आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन करा असे आवाहन माणगाव नगरपंचायत पोलिसांकडून करण्यात आले आहे.

या नियमांचे म्हणजेच विनामास्क तसेच सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांकडून व दुकानदारांकडून देि.३१ मार्च ते ३ एप्रिल २०२१ पर्यंत माणगाव नगरपंचायत व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत १६ हजार ५०० रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. कोरोनाचा माणगाव तालुक्यातील वाढता प्रादुर्भाव याकडे गांभीर्याने पाहून तालुक्यातील नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून आपण आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवा असे आवाहन तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.