tala market close

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र प्रशासनाने दि. १५ एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध, संचारबंदी व १४४ कलम लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तळा बाजारपेठेत गुरुवारी संचारबंदीमुळे शुकशुकाट पहायला मिळाले.



मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ’ब्रेक दि चैन ‘ कोविड रूग्णांची साखळी तोडण्यासाठी दि. १४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे २०२१ पर्यंत कडक निर्बंध, संचारबंदी व १४४ कलम लागू केेले आहे. तळा बाजारपेठ लहान असून तालुक्याची एकच मुख्य बाजारपेठ आहे.


अत्यावश्यक सेवा सोडली तर ईतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पोलिसांकडून बाजारपेठ परिसरात सतत गस्त घालून विनाकारण बाजारात फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे बसस्थानकातील अनेक बस देखील रद्द करण्यात आल्या आहेत.



अँपे, रिक्षा व मिनिडोअर यांना देखील फक्त आपत्कालीन सुविधा देण्यास सांगितले असल्याने खेड्यापाड्यातील नागरिकांना प्रवासाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे तळा बाजारपेठेत शुकशुकाट पसरल्याचे चित्र पहायला मिळाले.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us

By raigad

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.