corona help

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


कोरोनाच्या महामारीत अनेकांनी आपले भाऊ, आई, वडील, मुलगा, पत्नी, बहीण असे जिवलग गमावले. सूरतच्या एका दाम्पत्याचाही मुलगा या महामारीत बळी गेला. ज्या मुलासाठी पैसा जमवला तोच राहिला नाही म्हणून त्यांनी त्याच्यासाठी जमवलेला पैसा आता गरजुंसाठी खर्च करायला सुरुवात केली आहे.


रसिक मेहता आणि कल्पना मेहता असं या गुजरातच्या अहमदाबादमधील दाम्पत्याचं नाव आहे. रसिक आणि कल्पना या सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात गरजुंना आवश्यकत ती सर्व मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.



कोरोनाने त्यांच्या एकुलत्या एक मुलानं प्राण गमावले. ज्या मुलासाठी त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली तोच कोरोनानं त्यांच्यापासून हिरावून नेला. या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मेहता दामप्त्याने 15 लाख रुपयांची एफडी केली होती. पण मुलगा राहिला नाही, मग पैशाचं काय करणार. त्यामुळं त्यांनी इतर कुटुंबावर ही वेळ येऊ नये म्हणून हे 15 लाख रुपये कोरोनाच्या रुग्णांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला.



यानंतर रसिक मेहता आणि त्यांच्या पत्नी कल्पना यांनी कोरोना रुग्णांवर वेळेत आणि चांगले उपचार व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले. आतापर्यंत त्यांनी 200 पेक्षा अधिक रुग्णांना आयसोलेशनमध्ये किट आणि इतर साहित्य वाटप केलं आहे. कोरोनापासून प्रतिबंध व्हावा म्हणून त्यांनी 350 पेक्षा अधिक लोकांना त्यांच्या खर्चानं लसीकरणही केलं आहे.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.