Mahagaon Vaccine start

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


तळा तालुक्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या महागांव प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री रायगड जिल्हा तथा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य कु. आदितीताई तटकरे यांच्या प्रयत्नाने बुधवार दि. १२ मे २०२१ रोजी तळा तालुक्यातील महागांव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ४५ वर्षेवरील नागरिकांना कोरोनावर मात करण्यासाठी लस उपलब्ध करून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.


महागांव प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिली लस सालशेत गावचे नागरिक कृष्णा लोंढे यांना देण्यात आली. तालुका ठिकाणापासून अंदाजे १५ कि.मी अंतरावर महागांव असल्याने लसीकरणासाठी तळा व इंदापूर येथे जावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे.



आज कोरोना महामारी रोगावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले असल्याने या भागातील महीला ग्रामस्थांना सोयीस्कर होणार आहे. पंचक्रोशीतील जनतेचीउत्तमसोय झाली असून वेळ व पैसा वाचला असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.



या लसिकरणासाठी तळा पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, महागाव सरपंच सुषमा कसबले,उपसरपंच सचिनजाधव अॅड. उत्तम जाधव, सचिन कदम, किशोर शिंदे, अनंत खराडे, नितीन कदम, महागांव पोलीस पाटील कमलाकर मांगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद गोरेगावकर, डॉ. अमोल बिरवटकर, डॉ.लपाटील मॅडम, मोहीत मोरे, आशा प्रवर्तक नूतन ठिगळे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र महागांवचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.