Pali curfew

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


सुधागड तालुक्यात कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावण्यात यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्या अनुषंगाने शनिवार, दि. 15 मे पासून 23 मे पर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आज (13 मे) तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी दिली. सुधागडातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


या जनता कर्फ्यूमध्ये फक्त मेडिकल दुकानेच पूर्ण वेळ खुली राहणार आहेत. याठिकाणी औषधांशिवाय ब्रेड, कोल्ड्रिंक असे इतर सामान विकता येणार नाही. तसेच सकाळी 11 वाजेपर्यंत फक्त दुधाची दुकाने खुली राहतील, असे तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी सांगितले.


जनता कर्फ्यूसंदर्भात आमदार रविंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (12 मे) तहसील कार्यालयात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार पाटील, तहसीलदार दिलीप रायण्णावार व भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी व्यापारी, नागरिक व सर्वपक्षीय नेते यांच्यासोबत चर्चा केली.

त्यानंतर पाली शहरामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत सर्वांच्या सहमतीने निर्णय घेण्यात आला आहे. समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या या संकटाला परतवून लावूया, असे आवाहन आमदार रविंद्र पाटील यांनी उपस्थितांना केले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनुमते जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसू शकेल. त्यामुळे सर्वांनी जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

– दिलीप रायण्णावार, तहसीलदार, सुधागड-पाली

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.