corona vaccine effects

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतभर महामारी झाली, रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे अनेकांची जिवाभावाची माणसे यात दगावली आणि लसीकरण वाढविण्याचा मुद्दा समोर आला. लसीकरणामुळे माणसे दगावत आहेत अशा अफवाही आपल्याला वाचण्यात आला.

लसीकरणासंदर्भातील काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:


१) लस कोणती घ्यावी?

सध्या कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोनप्रकारच्या लस देण्यात येत आहेत. गर्भवती व स्तनदा महिलांनी कोविशील्ड लस घेणे चांगले. अन्य व्यक्तींनी दोन्हीपैकी कोणतीही लस घ्यावी. पहिल्या वेळी जी लस घेतली आहे तीच लस दुसऱ्यावेळी घ्यावी.


२) कोरोना होऊन गेला आहे? लस घ्यावी का? नक्की कधी घ्यावी?

तुम्हाला जरी कोरोना होऊन गेला असेल तरी लस घ्या. फक्त तुमचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यापासून ३० दिवसांनी अंतर ठेवून लस घ्या..


३) मी लसीची पहिली मात्रा घेतली व त्यानंतर काही दिवसांनी कोरोना पॉझिटिव्ह झालो मग दुसऱ्या मात्रेचे काय करावे.

अशा प्रकरणांमध्ये पहिल्या मात्रेनंतर झालेला कोरोना बूस्टर डोसचे काम करत असतो. त्यामुळे दुसरी मात्रा थेट ६० ते ९० दिवसांनीच घावी.


४) किमान ८ ते १० लोक असे माहित आहेत कि ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. किमान २-३ जण असे आहेत ज्यांना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर संसर्ग झाला. असे असल्यास लसीचा उपयोग काय?

लसीकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात हे ठरविणे खरोखर कठीण आहे. संसर्गापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी लस नसून तुम्हाला थेट रुग्णालयात दाखल व्हावे नये यासाठी लस आहे. आजारापासून संपूर्ण बचावाचे कवच लसीची दुसरी मात्रा २-३ आठवडयांनी तयार होते. त्यामुळे लसीकरण झाले म्हणून काळजी घेणे सोडून चालणार नाही. योग्य ती काळजी घ्यावीच लागणार.


५) कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या लसींच्या बाबतीत दोन्ही मात्रांमधील अंतर किती असावे?

दोन्ही मात्रांमधील अंतर हे ४ आठवड्यांचे असावे, त्यामुळेच लस पूर्णपणे प्रभावी ठरू शकेल.


६) कोविशील्डच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, अधिक संरक्षणासाठी कोवॅक्सीन किंवा कोविशील्डचीच आणखी मात्रा घ्यावी का?

कृपया दोन मात्रा झाल्यानंतर तिसरी मात्रा घेऊ नका. त्यामुळे दुष्परिणामांची शक्यता अधिक आहे.


७) आपण अत्यंत तंदुरुस्त असून रोज जिम, व्यायाम व योगा करतो. अन्य कोणत्याही व्याधी नाहीत. व्यायामासोबत रोज सप्लिमेंट आणि च्यवनप्राश घेतो, लस घेण्याऐवजी माझ्या रोगप्रतिकार शक्तीवर विसंबून राहू शकतो का?

तुमच्या प्रयत्नांचे कौतुकच केले पाहिजे. स्वतःची काळजी तुम्ही घेत आहात. तंदुरुस्त नसलेल्या माणसांच्या तुलनेत तुम्ही गंभीर आजार होण्याचा आणि मृत्यूचा धोका कितीतरी कमी केला आहे. सध्या आजार व मृत्यूचे प्रमाण विशीतल्या आणि तिशीतल्या तरुणांमध्येही वाढल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर अतिरिक्त भरवसा न ठेवता लवकरात लवकर लस घेणे योग्य ठरेल.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार अनेक गरीब देशांना लस मिळेपर्यंत २०२३-२०२४ साल उजडेल, “तेही कुणी दान दिल्यावरच”. या पार्श्वभूमीवर आपण खूप भाग्यवान आहोत, कारण आपण लस उत्पादन करणाऱ्या देशात राहतो. त्यामुळे लवकरात लवकर लस घ्या.
– डॉ. संजय गायकवाड

लस प्रभावी ठरेल अथवा न ठरेल परंतु हमखास आणि १००% प्रभावी ठरतो तो “मास्क”


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.