आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



नव्याने उभारण्यात येणाऱ्या रायगड ड्रग पार्कसाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावे अशी सूचना मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी दिली. देशात औषधांच्या मुबलक पुरवठ्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा मानला जातो.



रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा या तालुक्यांमधील एकूण १७ गावांच्या जमिनीवरती हा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणत्याही गावांचे स्थलांतर होणार नाही तसेच हा प्रकल्प ३० हजार कोटींचा असून त्यात अंदाजे ७५ हजार लोकांना रोजगार निर्माण होणार आहे.



या प्रकल्पाबाबत उद्योगविभागातर्फे मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले, यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंग तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.