tala wave waterfall and dam

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील तळा येथील प्रसिद्ध वावे धबधब्यावर पर्यटकांना जायला बंदी घालण्यात आली आहे.



तळा तालुका डोंगराळ निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने पावसाळी धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असतात. मुंबई-गोवा महामार्गामधून इंदापूर पासून पश्चिमेला तळा शहराकडे येताना १२ किमी ला डाव्या बाजूला वावे धबधबा लागतो. सुरुवातीपासूनच दमदार कोसळलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यासह तळा तालुक्याला झोडपले. त्यामुळे तालुक्यातील नद्या, तलाव, विहिरी तसेच धबधबे तुडुंब भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे वावे धबधबा पांढऱ्याशुभ्र फेसाळयुक्त रंगात धो-धो वाहत आहे.



धबधब्याच्या आजूबाजूला हिरवेगार मनमोहक निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली दृश्य पहायला मिळते.पक्ष्यांच्या वेगवेगळ्या स्वरांचा किलबिलाट, बहरलेली वृक्षवल्ली, धबधब्यातील पाण्याचा खळखळाट यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक कुटुंबासह या धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी येत असतात. परंतु कोरोना विषाणूचा तळा तालुक्यात वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.



शनिवार व रविवारी वावे धबधबा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालेला असतो अशातच एखादा बाधित रुग्णाच्या संपर्कात येऊन अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वावे धबधब्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. तसेच या धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
– श्रीकांत नांदगावकर तळा


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.