jio-fiber-cable-shrivardhan-st-bus

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



जिओ केबलसाठी खणलेले खड्डे रस्त्याच्या खूप जवळून खोडण्यात आले आहेत, ज्यामुळे आता सर्व वाहन चालकांना खूप मनस्ताप मनःस्ताप झाला असून मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम ख्यात्याने मात्र याकडे अजूनही दुर्लक्ष केले आहे. तरी येथील जनता उग्र झाली असून बांधकाम खात्यावर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे.



तरी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या वस्तुस्थितीकडे लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे. खणलेले खड्डे वरवर बुझविल्याने आज त्यात मालवाहतूक एस्टी खचुन पलटी होऊन दरीत कोसळली असती पण ड्रायव्हरच्या सावधतनेमुळे मोठा अपघात होताना वाचला आहे.



पुढचे चार महिने पावसाळी असून त्या खड्डयांमधील माती आणखी खचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तरी वारंवार होणारे अपघात पुढे हेऊ नयेत त्यासाठी या खड्यांचा व्यवस्थित बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
-बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे)



आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.