bday poladpur

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



पोलादपूर (संदिप जाबडे): पोलादपूर तालुक्याचे युवा उद्योजक व द्विशतकवीर जीवन विमा प्रतिनिधी ह भ प गोपीचंद चंद्रकांत घाडगे यांनी आपला वाढदिवस आपल्या मूळ करंजे या गावी अनोख्या पद्धतीने साजरा केला. आपल्या वाढदिवशी आपल्या हातून सत्कर्म घडावे या उद्देशाने त्यांनी करंजे या गावी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. आपला वाढदिवस मेजवानी करीत, मद्यपान प्राशन करीत साजरा करणाऱ्या तरुणाईसमोर ह भ प गोपीचंद घाडगे यांनी वेगळा आदर्श ठेवला आहे. आयोजित आरोग्य शिबिरात १०६ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.



यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन रायगड भूषण गुरुवर्य विठ्ठल अण्णा घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. करंजे गावातील ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात या शिबिरास प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रम तालुक्यातील देवळे, करंजे या ठिकाणी घेण्यात आला.



यावेळी डॉक्टर शरद गुट्टे, सुशांत जगताप, उद्योजक अक्षय पेंडसे, विशाल आंबळे, सरपंच बबीता दळवी, अनिल दळवी, उपसरपंच शंकर केसरकर, विठ्ठल अण्णा घाडगे,दत्तात्रय घाडगे,निवृत्ती घाडगे,तुकाराम पवार,सुनील मेस्त्री,सुभाष घाडगे,आशासेविक नंदा मेस्त्री,मामा घाडगे,मुख्याध्यापक, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठोबा रेनोसे,अनंत घाडगे यांनी केले.



ह भ प गोपीचंद घाडगे यांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.