poladpur-charai-primary-marathi-school

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


पोलादपूर – संदिप जाबडे: पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पाल्यांचा चरई प्राथमिक शाळेत प्रवेश जिल्हा परिषद शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम


दिवसेंदिवस खाजगी शाळांचे वाढते प्रमाण व इंग्रजी भाषेतील शिक्षणाकडे पालकांचा वाढता कल पाहता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत वर्गांच्या पटसंख्येत घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्राथमिक शाळांत दर्जेदार शिक्षण मिळत नाही, अशी चुकीची समजूत बऱ्याच पालकांमध्ये असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.



पटसंख्या नसल्यामुळे अनेक प्राथमिक शाळांना बंद करण्याची वेळ शासनावर आली आहे. परंतु यामुळे गरजू, गरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांकडे दररोजचे प्रवासभाडे देणे खिशाला परवडत नसल्याने, वाहतुकीचे साधन उपलब्ध होत नसल्याने अनेक पाल्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे.



या सर्व बाबींचा विचार करता व मराठी भाषिक प्राथमिक शाळा टिकून रहाव्या या उद्देशाने पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक नारायण कुंडले, अमोल मोरे, आदिनाथ पोटे, पंकज निकम, हेमराज राठोड, नारायण रेपे या शिक्षकांनी आपल्या पाल्यांना पोलादपूर तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या प्राथमिक शाळा चरई येथे इयत्ता १ ली च्या वर्गात प्रवेश देत इतर पालक वर्गासमोर एक आदर्श समोर ठेवला आहे.



मातृभाषेतुन शिक्षण घेतल्याने विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते हेच पालकांना पटवून देण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील शिक्षक बांधवांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. इंग्रजी माध्यमाकडे जाणारी ज्ञानगंगा आता मराठी कडे वळवण्याचा छोटासा प्रयत्न या माध्यमातून दुर्गम अशा पोलादपूर तालुक्यात होत आहे. या सहा शिक्षकांनी या कामी पुढाकार घेवून चरई शाळेत मुलांचे प्रवेश निश्चित केले आहेत. चरई शाळेचे मुख्याध्यापक श्याम लवंगारे सरांनी दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षणाचा ध्यास घेवून काम करण्याविषयी आश्वस्त केले आहे. सहशिक्षिका संगीता पांचाळ मॕडम, श्री. उकार्डे सर, नारायण कुंडले सर या कामी प्रयत्नशिल राहणार आहेत.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.