mangaon shops sealed

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



माणगाव शहरासह तालुक्यात दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. या महामारीला रोखण्यासाठी शासनाने काही नियम घातले आहेत. मात्र शहरातील काही व्यापारी नियमांचे पालन करीत नसल्याने समजल्यानंतर माणगाव नगरपंचायतीने धडक कारवाई करत, 4 दुकाने सील केली. तर काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.



माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्यासह मंगेश पाटील, रामदास पवार व इतर कर्मचार्‍यांनी माणगाव शहरात फिरुन ही कारवाई केली. यावेळी जुन्या बस स्थानकाजवळील श्री जसोल किराणा दुकान, फळ विक्रेते, महामार्गावरील टपर्‍या, नाकोडा स्टील आदी दुकाने शासनाच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.



कोरोना आटोक्यात येत नसताना माणगाव शहरात जत्रेसारखी गर्दी दररोज पहायला मिळत आहे. कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून दररोज 40 ते 60 कोरोनाग्रस्त रुग्ण माणगावात सापडत आहेत. दुसर्‍या लाटेत आतापर्यंत 99 जणांचे जीव गेले आहेत. पोलीस व नगरपंचायतीने दिलेल्या आदेशाचे काही व्यापारी पालन करतात. पण काहीजण नियमांचे उल्लंघन करुन, दुकानात जास्त गर्दी करुन कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे आढळून आले.



अशा दुकानांवर माणगाव नगरपंचायतीने धडक कारवाई करत, 4 दुकाने सिल करण्यात आली, तर काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.