roha-talathi-bribe

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



अमोल पेणकर रोहे: तालुक्यातील महसूल खात्याचे भ्रष्टाचारी कारनामे याआधीही दिव जमीन प्रकरणाने चव्हाट्यावर आले आहेत. यासर्व भ्रष्टाचारी कारभाराविरोधात अलिबाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. रोह्यामधील घोसाळे मंडळाचे प्रभारी अधिकारी राजेश वसंत जाधव व सारसोलीचे तलाठी महादेव जगन्नाथ मोरे यांना २५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून सर्व सामान्य शेतकऱ्यांमध्ये या कारवाईने समाधान व्यक्त होत आहे.



यासंबंधी मिळालेल्या माहीतीनुसार यामधील तक्रारदार यांची तलाठी सजा भालगावमध्ये वडिलोपार्जित जमीन होती. तक्रारदार यांचे वडिलांनी त्यांची जमीन नोंदणीकृत बक्षिसपत्र करून तक्रारदार यांचे नावे केली होती. यानंतर या जमिनीच्या सातबाऱ्यावर आपले नाव लागावे यासाठी आरोपी तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडे वारंवार तक्रारदार यांनी चौकशी केली.



त्यानंतर आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे याकामासाठी ३००० रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर तक्रारदार व आरोपी यांचेत २५०० रुपयांची तडजोड झाली. गुरुवार, दि. १५ जुलै रोजी दुपारी रोहा येथे मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा लावत मंडळ अधिकारी व तलाठी यांना लाचेची २५०० रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.



लाचलुचपत प्रतिबंधक रायगड विभागाच्या पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक अरुण घरत, पो. ह. दिपक मोरे, पो. ह. सुरज पाटील, पो. ना. कौस्तुभ मगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. सदर कारवाईबाबत सामान्य शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.