rainfall in raigad

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सखल भागातील विशेषतः नदी, खाडी, समुद्र किनार्‍यावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



जिल्ह्यातील दरडप्रवण गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, पावसाचे प्रमाण विचारात घेऊन अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच प्रवास करावा, धबधबा, तलाव, खाडी, नदी तसेच समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी जाऊ नये, गड-किल्ले येथे ट्रेकिंगसाठी पावसात जाऊ नये, पाण्याचा वेग जास्त असल्याने नदी-नाले धाडसाने क्रॉस करून जाण्यासाठी प्रयत्न करू नये, पुलावरून-रस्त्यावरुन संरक्षक दगड पाण्याखाली गेले असल्यास त्यावरुन वाहन चालवू नये असे आवाहन रायगडकरांना करण्यात आले आहे.



आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.